Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts
Monday, December 31, 2012
Saturday, April 24, 2010
शब्दांसाठी
दोन शब्द
वाचून स्तब्ध
करती मुग्ध
शब्द बदध
ओळी चार
विचारांना धार
कल्पनांचे अपार
आहेत उपकार
कडवी तीन
विचारा धिन
कलेच्या स्वाधीन
भाग्याचा दिन
कविता अशी
होवो पूर्ण
केवड्याची जशी
सुगंधी पर्ण
वाचून स्तब्ध
करती मुग्ध
शब्द बदध
ओळी चार
विचारांना धार
कल्पनांचे अपार
आहेत उपकार
कडवी तीन
विचारा धिन
कलेच्या स्वाधीन
भाग्याचा दिन
कविता अशी
होवो पूर्ण
केवड्याची जशी
सुगंधी पर्ण
परिमल (२४.०४.२०१०)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
शब्दच ढाल
शब्दच तलवार
शब्दांच्या छातीवरशब्दच तलवार
शब्दांचे वार
शब्दांच्या समरात
होऊयात अमर
आहेइथे जीत
गाउया विजयगीत
शब्दांच्या लाटांवर
नेहमीच आनंदी
शब्दांना भरती
कधीना ओहोटी
निखळ निर्मळ
पाण्यासारखे नितळ
शब्दकेवढे प्रेमळ
शब्दांसाठीच तळमळ
परिमल (२७.०४.२०१०)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
शब्दांच्या खेळात
शब्दांचे लपंडाव
स्वच्छन्दी शोधुयात
अर्थाचे भाव
शब्दांच्या शर्यति
अवती भवती
वेगाने धावती
प्रकाशाला भेदति
शब्दांच्या गणितात
नेहेमीच बेरीज
उत्तिर्ण म्हणिवतात
भूमितीच्या खेरीज
शब्दांचा इतिहास
आहे मोठाखास
ज्ञानोबा रामदास
अशांचे वास
परिमल (२९.०४.२०१०)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
शब्दांची भाषा ... त्यांची
सुगंधी नशा
दरवळती दिशा ... आता
उमलति आशा
शब्दांचे बोल ... त्यांच्या
भावना सखोल
नाहीयांना तोल ... हे
भलतेच अनमोल
शब्दांचा महाल ... त्यात
कल्पनांची मशाल
पेटावूया खुशाल ... आता
रोषणाई कमाल
शब्दांच्या ज्योती ... त्यांच्या
अर्थाच्या वाती
जागवुया राती ... आता
कवितांच्या साथी
परिमल (०१.०५.२०१०)
सुगंधी नशा
दरवळती दिशा ... आता
उमलति आशा
शब्दांचे बोल ... त्यांच्या
भावना सखोल
नाहीयांना तोल ... हे
भलतेच अनमोल
शब्दांचा महाल ... त्यात
कल्पनांची मशाल
पेटावूया खुशाल ... आता
रोषणाई कमाल
शब्दांच्या ज्योती ... त्यांच्या
अर्थाच्या वाती
जागवुया राती ... आता
कवितांच्या साथी
परिमल (०१.०५.२०१०)
Tuesday, April 20, 2010
मागतो मी एवढच
शब्द अनेक सापडलेले
अर्थ ना कळलेला
यमक असे जुळलेले
गोडवा ना मिळालेला
कळी पूर्ण उमललेलि
सुगंध ना दरवळलेला
वेली अशा पसरलेल्या
आधार ना मिळालेला
देशील तू अर्थ नवा अन् आणशील तू गोडवा
देशील तू सुगंध नवा अन् बनशील तू आधार
मागतो मी एवढच ; हवय मला तेवढच
रांगोळी ही मांडलेली
रंग ना रंगलेले
ज्योत अशी पेटलेली
उब ना मिळालेली
पाउस असा बरसलेला
ओलावा ना आलेला
पौर्णिमा अशी झालेली
भरती ना आलेली
भरशील तू रंग नवे अन् आणशील मैत्रीची उब
देशील स्नेहाचा ओलावा अन् आणशील प्रेमाची भरती
मागतो मी एवढच ; हवय मला तेवढच
गणित हे सुटलेले
रित ना समजलेली
संकल्प हा ठरलेला
मार्ग ना सापडलेला
स्पर्श असे होताना
जाणिवा ना राहिलेल्या
श्वास असा घेताना
प्राण ना राहिलेला
जाणवशील तू प्रित-रित अन् शोधशील तू मार्ग नवे
जागवशील तू जाणिवा नव्या अन् देशील प्रितीस प्राण
आता . . . मागतो मी एवढच ; हवय मला तेवढच
परिमल
Monday, March 29, 2010
तुझ्याविना . . .
दूर जाहता सोबत सुटते
नातं मात्र तुटत नाही
दिशा बदलता अंतर वाढते
दुरावा मात्र सोसवत नाही
तुझ्याविना मी कसा ... कुठेच मात्र पूर्ण नाही ... कुठेच मात्र पूर्ण नाही
शब्द सुरांचे अर्थ मधाचा
आवाज मात्र घुमत नाही
सूर साथीचे लय तालीचि
संगीत मात्र नांदत नाही
तुझ्याविना मन कसे ... आता मात्र उमलत नाही ... आता मात्र उमलत नाही
क्षण दोघांचा क्षण भाग्याचा
शोधतो मात्र सापडत नाही
गोलावा डोळ्यांचा ओलावा अश्रुंचा
हे पाणी मात्र थांबत नाही
तुझ्याविना मी कसा ... कुठेच मात्र उरत नाही ... कुठेच मात्र उरत नाही
सकाळ होते तांबड पडत
मनात मात्र उजाडत नाही
दोघे एकत्र नशीब सुदैव
हे स्वप्न मात्र सरत नाही
तुझ्याविना दिस कसे ... आता मात्र जगत नाही ... आता मात्र जगत नाही
परिमल
Tuesday, March 9, 2010
तू आणि मी . . .
किती वेडे होतो आपण एकमेकांसाठी . . . तू आणि मी
नाविन्याच्या बहरामध्ये
ओढींची ही झाली सुमने
आनंदाच्या धाग्यावर मग
सुमनांची मी माळ गुंफतो
किती एकरूप होतो आपण एकमेकांमध्ये . . . तू आणि मी
मधुरतेच्या बंधनामध्ये
सहवासाच्या झाल्या गाठी
विश्वासाच्या धाग्यावर मग
गाठींची मी माळ गुंफतो
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
पण आता . . .
किती दुरावाले आहोत आपण एकमेकांपासून . . . तू आणि मी
आयुष्याच्या चक्रामध्ये
दिशांचे ही झाले फसवे
नशीबाच्या या धाग्यावर मग
धाग्यांचीच मी माळ गुंफतो
किती अनोळखी बनलोयत आपण एकमेकांपासून . . . तू आणि मी
आठवणींच्या शिंपल्यामध्ये
अश्रूंचे हे झाले मोती
तुटलेल्या या धाग्यावर मग
मोत्यांची मी माळ गुंफतो
परिमल
Sunday, February 21, 2010
ती . . .
कालच तिला पाहिलेले
कधी ना आम्ही भेटलेले
दोघे असे हे हरवलेले
विचारांच्या दुनियेत सापडलेले
चित्र मनात रंगविलेले
कागदावर कधी ना उतरविलेले
दुमडून असे हे ठेविलेले
अचानक समोर उलगडिलेले
--------------------------------
अनिश्चित सगळे असेच असते
कल्पनेला कधी माहीतच नसते
नकळत सारे घडतच असते
ठरवून कधी हे होणारेच नसते
---------------------------------
नुसताच असा विचार करतो
उगाचच वेळ वाया घालवतो
शब्दांचाच असा घड सांडतो
तिला मी . . . तिलाच शोधतो
परिमल
परिमल
Sunday, January 31, 2010
अशी तू माझी...
त्या रातीच्या वेळी अवेळी
अंधाराची काळी सावली
तेजोमय तू दूर अंतरी
नजरेलाही नशा जाहली
अंगवारती शुभ्र ओढणी
माथ्यावरती वलय केशरी
जवळ जाउनि स्तब्ध राहुनी
तुला पाहुनि दिशा मिळाली
दु:खाने तू ग्रासित दिसती
डोळ्यांचे ना अश्रु पुसती
स्पर्श जाहता मी ही जखमी
अशी तू माझी मेणबत्ती
अशी तू माझी मेणबत्ती . . .
ता. क. : क्षमस्व. "मेणबत्ती" ऐवजी "प्रेमभक्ती" लिहा आणि १४ फेब्रुवारी ला वापरा ! :p
आपला ... परिमल :D
Subscribe to:
Posts (Atom)