Monday, March 29, 2010

तुझ्याविना . . .

दूर जाहता सोबत सुटते
नातं मात्र तुटत नाही
दिशा बदलता अंतर वाढते
दुरावा मात्र सोसवत नाही
तुझ्याविना मी कसा ... कुठेच मात्र पूर्ण नाही ... कुठेच मात्र पूर्ण नाही

शब्द सुरांचे अर्थ मधाचा
आवाज मात्र घुमत नाही
सूर साथीचे लय तालीचि
संगीत मात्र नांदत नाही
तुझ्याविना मन कसे ... आता मात्र उमलत नाही ... आता मात्र उमलत नाही

क्षण दोघांचा क्षण भाग्याचा
शोधतो मात्र सापडत नाही
गोलावा डोळ्यांचा ओलावा अश्रुंचा
हे पाणी मात्र थांबत नाही
तुझ्याविना मी कसा ... कुठेच मात्र उरत नाही ... कुठेच मात्र उरत नाही

सकाळ होते तांबड पडत
मनात मात्र उजाडत नाही
दोघे एकत्र नशीब सुदैव
हे स्वप्न मात्र सरत नाही
तुझ्याविना दिस कसे ... आता मात्र जगत नाही ... आता मात्र जगत नाही

परिमल

No comments: