Tuesday, April 20, 2010

मागतो मी एवढच

शब्द अनेक सापडलेले
अर्थ ना कळलेला
यमक असे जुळलेले
गोडवा ना मिळालेला

कळी पूर्ण उमललेलि
सुगंध ना दरवळलेला
वेली अशा पसरलेल्या
आधार ना मिळालेला

देशील तू अर्थ नवा अन् आणशील तू गोडवा
देशील तू सुगंध नवा अन् बनशील तू आधार

मागतो मी एवढच ;  हवय मला तेवढच


रांगोळी ही मांडलेली
रंग ना रंगलेले
ज्योत अशी पेटलेली
उब ना मिळालेली

पाउस असा बरसलेला
ओलावा ना आलेला
पौर्णिमा अशी झालेली
भरती ना आलेली

भरशील तू रंग नवे अन् आणशील मैत्रीची उब
देशील स्नेहाचा ओलावा अन् आणशील प्रेमाची भरती

मागतो मी एवढच ; हवय मला तेवढच


गणित हे सुटलेले
रित ना समजलेली
संकल्प हा ठरलेला
मार्ग ना सापडलेला

स्पर्श असे होताना
जाणिवा ना राहिलेल्या
श्‍वास असा घेताना
प्राण ना राहिलेला

जाणवशील तू प्रित-रित अन् शोधशील तू मार्ग नवे
जागवशील तू जाणिवा नव्या अन् देशील प्रितीस प्राण
  
आता . . . मागतो मी एवढच ; हवय मला तेवढच

परिमल


No comments: