Saturday, April 24, 2010

शब्दांसाठी




दोन शब्द
वाचून स्तब्ध
करती मुग्ध
शब्द बदध


ओळी चार
विचारांना धार
कल्पनांचे अपार
आहेत उपकार


कडवी तीन
विचारा धिन
कलेच्या स्वाधीन
भाग्याचा दिन


कविता अशी
होवो पूर्ण
केवड्याची जशी
सुगंधी पर्ण

परिमल  (२४.०४.२०१०)

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


शब्दच ढाल
शब्दच तलवार
शब्दांच्या छातीवर
शब्दांचे वार

शब्दांच्या समरात
होऊयात अमर

आहेइथे जीत
गाउया विजयगीत 

शब्दांच्या लाटांवर 
नेहमीच आनंदी
शब्दांना भरती
कधीना ओहोटी

निखळ निर्मळ
पाण्यासारखे नितळ
शब्दकेवढे प्रेमळ
शब्दांसाठीच तळमळ

परिमल  (२७.०४.२०१०)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

शब्दांच्या खेळात
शब्दांचे लपंडाव
स्वच्छन्दी शोधुयात
अर्थाचे भाव

शब्दांच्या शर्यति
अवती भवती
वेगाने धावती
प्रकाशाला भेदति

शब्दांच्या गणितात
नेहेमीच बेरीज
उत्तिर्ण म्हणिवतात
भूमितीच्या खेरीज

शब्दांचा इतिहास
आहे मोठाखास
ज्ञानोबा रामदास
अशांचे वास

परिमल   (२९.०४.२०१०)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

शब्दांची भाषा ... त्यांची 
सुगंधी नशा 
दरवळती दिशा ... आता 
उमलति आशा 

शब्दांचे बोल ... त्यांच्या 
भावना सखोल
नाहीयांना तोल ... हे 
भलतेच अनमोल 

शब्दांचा महाल ... त्यात 
कल्पनांची मशाल 
पेटावूया खुशाल ... आता 
रोषणाई कमाल 

शब्दांच्या ज्योती ... त्यांच्या 
अर्थाच्या वाती 
जागवुया राती ... आता 
कवितांच्या साथी

परिमल (०१.०५.२०१०)

No comments: