Tuesday, March 9, 2010

तू आणि मी . . .



किती वेडे होतो आपण एकमेकांसाठी . . . तू आणि मी
नाविन्याच्या बहरामध्ये
ओढींची ही झाली सुमने
आनंदाच्या धाग्यावर मग
सुमनांची मी माळ गुंफतो

किती एकरूप होतो आपण एकमेकांमध्ये . . . तू आणि मी
मधुरतेच्या बंधनामध्ये
सहवासाच्या झाल्या गाठी
विश्वासाच्या धाग्यावर मग
गाठींची मी माळ गुंफतो

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 

पण आता . . .

किती दुरावाले आहोत आपण एकमेकांपासून . . . तू आणि मी
आयुष्याच्या चक्रामध्ये
दिशांचे ही झाले फसवे
नशीबाच्या या धाग्यावर मग
धाग्यांचीच मी माळ गुंफतो

किती अनोळखी बनलोयत आपण एकमेकांपासून . . . तू आणि मी
आठवणींच्या शिंपल्यामध्ये
अश्रूंचे हे झाले मोती
तुटलेल्या या धाग्यावर मग
मोत्यांची मी माळ गुंफतो

परिमल