आम्ही गेले काही दिवस बराच विचार करत होतो. पण काही उपाय सापडत नव्हता. मग एका ज्योतिष्याकडे गेलो.
ज्योतिषी म्हणाला, " तुम्हांला 'मनी'माउ नाही आवडत . . . म्हणूनच पगार कमी मिळतो. मांजर पाळा. फरक पडेल"
ऐकून आम्हाला थोडा विचित्र वाटला. दोन मिनिट विचार केला आणि मग विचारला “ कुत्रा नाही चालणार का हो? मला कुत्रा आवडतो. कोणता ही असुदे . . आवडतो !”.
या प्रश्नावर ज्योतिशाने अशी काही भूंकणारी नजर टाकली . . की मी मुकत्याने शेपूट खाली घालून मांजर पाळण्याचा निर्णय घेतला. आणि
तडिक जाउन मांजर आणली.
मग आमच्या ‘मनी’ ला खुश ठेवण्या साठी काय काय नाही केला . . पूर्ण ‘मनी’ लावला.
नित्या नेमानी तिला दूध पाजल, उंदीर पकडून दिले, टॉम अँड जेरीमधे टॉम जिंकणारे अपिसोड्स लावले.
पण नशिब आमच. आज सहा महिने उलटले . ना पगार वाढ झाली ना प्रमोशन मिळाल. ज्योतिष्याला 'मनी' च शिव्या दिल्या.
. . . .
आजच पूर्ण सोसायटीत बातमी पसरली . आमच्या समोरच्यांना प्रमोशन मिळाल.
अधिक चौकशी केली तर कळाल , त्यांची मांजर गरोदर आहे आणि त्याच कारण आम्ही 'मनी' म्हणून आणलेला 'बोका' आहे.
आता . . . प्रमोशन गेल, मनी गेला आणि 'मनी' ही गेली. फक्त मनीच “म्या उ” करतो ! ! !
:-)
परिमल

1 comment:
Ha Ha Ha... good one..!!
Post a Comment